जयश्री गणेश आहिवळे यांचा प्रभाग २ मधील भावी नगरसेविका म्हणून स्टेटस
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ - फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वार्ड क्र. 2 मध्ये सामाजिक माध्यमांवर यांच्या नावाचे “भावी नगरसेवीका” म्हणून स्टेटस आणि चर्चांना उधाण आले आहे.
जयश्री गणेश आहिवळे या बुद्धवासी माजी नगरसेवक गणेश आहिवळे यांच्या पत्नी आहेत, गणेश यांच्यानंतर जयश्री यांनी देखील महिलांच्या प्रश्नावर काम करत लोकसंपर्क ठेवला तर गणेश अहिवळे यांचे बंधू प्रशांत (बारीक राव) आहिवळे यांनीही गणेश यांच्या कार्याचा वसा पुढे चालवत, सामाजिक बांधिलकी जपली आहे. प्रशांत हे अनेक वर्षांपासून राजे गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून, या माध्यमांतून त्यांनी फलटण शहरासह ग्रामीण भागात विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम राबवले आहेत.
त्यांच्या कार्यामुळे व जनसंपर्कामुळे विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळेच प्रभाग क्रं 2 मध्ये त्यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावरही स्टेट्सच्या माध्यमातून पोस्ट व्हायरल होत आहे.
No comments