Breaking News

प्रभाग २ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे कुणाल किशोर काकडे यांचे नाव चर्चेत

Kunal Kishore Kakade's name is in the news in Ward 2.

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ -  फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मध्ये, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे, उच्च शिक्षित आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवा नेतृत्व कुणाल किशोर काकडे हे एक नवा पर्याय म्हणून चर्चेत आले आहेत.

    कुणाल काकडे हे गेल्या काही वर्षांपासून स्थानिक पातळीवर सामाजिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. समाजात ऐक्य, प्रगती आणि विकासाचा संदेश पोहोचविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेचे आणि प्रबोधनाचे विचार त्यांनी आपल्या कार्यपद्धतीत रुजवले आहेत, असे त्यांच्या सहकाऱ्यांचे मत आहे.

कुणाल काकडे यांच्या एन्ट्रीमुळे या प्रभागात तुल्यबळ लढत निश्चित दिसत असून, राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत आहेत. फलटणमधील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ही निवडणूक केवळ परंपरेची लढत न राहता, आंबेडकरी विचारसरणी आणि युवा नेतृत्वाच्या चळवळीची नवी दिशा ठरण्याची शक्यता आहे.

No comments