किशोर घोलप यांचेकडून गरजू लोकांना मोफत धान्य
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ ऑक्टोबर २०२५ - येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर घोलप यांनी स्थानिक रहिवाशांना आपल्या शेतातील पिकलेली बाजरी मोफत वाटून एक सामाजिक बांधिलकी जोपासली.
एक हात मदतीचा सामाजिक बांधिलकीचा, या सामाजिक बांधिलकीने सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून किशोर घोलप यांची फलटण मध्ये ओळख आहे. राजकीय सामाजिक तसेच शैक्षणिक उपक्रमातून किशोर घोलप यांनी आत्तापर्यंत अनेक गरजू लोकांना तन मन धनाने नेहमीच मदत करतात त्याचबरोबर सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होत सर्वांना अतिशय चांगले सहकार्य असते त्या अनुषंगाने मे महिन्यात फलटण तालुक्यातील विविध भागात प्रचंड प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते तर उभी पिके अक्षरशः पावसाच्या पाण्यात वाहून गेली त्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते किशोर घोलप यांनी आपल्या तीन एकर शेतातील बाजरी काढून ती सर्व तयार झालेली बाजरी आपल्या भागातील गरजूना वाटली यावेळी सर्वांनी किशोर घोलप यांचे सर्वांनी आभार मानले, यावेळी घोलप कुटुंबीय उपस्थित होते.
No comments