Breaking News

फलटण नगरपरिषद, फलटण सार्वत्रिक निवडणूक २०२५ - जाहीर सूचना - प्रभाग क्रमांक १ ते १३ प्रभागामध्ये विभागून प्रारूप प्रभाग यादी प्रसिध्द

Phaltan Municipal Council, Phaltan General Election 2025 - Public Notice
फलटण नगरपरिषद, फलटण सार्वत्रिक निवडणूक २०२५ 
- जाहीर सूचना -
    मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेशानुसार मतदार यादी विभाजनाच्या कार्यक्रमानुसार २५५- फलटण अ.जा या विधानसभा मतदार संघाची दिनांक ०१/०७/२०२५ या अधिसूचित दिनांकास अस्तित्वात असलेली मतदार यादी फलटण नगरपरिषदेच्या एकूण प्रभाग क्रमांक १ ते १३ प्रभागामध्ये विभागून प्रारूप प्रभाग यादी दिनांक ०८/१०/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर प्रारूप मतदार यादीवर ज्या नागरिकांच्या हरकती व सूचना असतील त्यांनी दिनांक ०८/१०/२०२५ ते १३/१०/२०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेपर्यंत आपल्या हरकती व सूचना फलटण नगरपरिषद कार्यालयात निम्नस्वाक्षरीत यांचेकडे दाखल कराव्यात.

    हरकत दाखल करण्यासाठी मा. राज्य निवडणूक आयोगाने विहित केलेल्या हरकत अर्जाच्या नमुन्यातच हरकत अर्ज दाखल करणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत एकगठ्ठा पद्धतीने किंवा एकत्रित यादींच्या स्वरुपात हरकती दाखल करता येणार नाही व असे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. हरकतदार हा स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक राहिल. तसेच सदर दिनांकानंतर आलेल्या सूचना व हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच सदर प्रारूप मतदार यादी ही विक्री साठी नगर परिषदच्या भांडार विभागाकडे (प्रती पान रक्कम रुपये ४/- प्रमाणे) उपलब्ध राहिल. तसेच हरकती देत असताना हरकत ज्या बाबत दाखल करीत आहे त्याचे पुरावे हरकत दाराने सोबत जोडणे बंधनकारक राहील अन्यथा सदर हरकतीची दखल घेतली जाणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी.

ठिकाण - फलटण
दिनांक- ०८ ऑक्टोबर २०२५

निखिल जाधव
मुख्याधिकारी
फलटण नगरपरिषद, फलटण


No comments