फलटण नगरपरिषदेच्या १३ प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर; अनुसूचित जातीसाठी ५, ओबीसीसाठी ७ तर १५ जागा खुल्या प्रवर्गासाठी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ८ ऑक्टोबर - फलटण नगरपरिषदेच्या एकूण १३ प्रभागांची आरक्षण सोडत आज प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन मागील नवीन इमारत येथे पार पडली. या सोडतीत अनुसूचित जातींसाठी ५, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी ७ तर १५ जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत.
प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. निवडणूक निरीक्षक मुश्ताक महात व तेजस पाटील यांनी सोडतीची प्रत्यक्ष प्रक्रिया पार पाडली. नगरपालिका शाळेतील मुला-मुलींच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
एकूण १३ प्रभागांतील आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित झाले आहे –
प्रभाग क्र. १ अ – अनुसूचित जाती (महिला), १ ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. २ अ – अनुसूचित जाती (महिला), २ ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३ अ – अनुसूचित जाती (सर्वसाधारण), ३ ब – सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. ४ अ – ओबीसी (महिला), ४ ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५ अ – अनुसूचित जाती (महिला), ५ ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. ६ अ – ओबीसी (सर्वसाधारण), ६ ब – सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. ७ अ – सर्वसाधारण (महिला), ७ ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. ८ अ – ओबीसी (सर्वसाधारण), ८ ब – सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. ९ अ – ओबीसी (महिला), ९ ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. १० अ – ओबीसी (महिला), १० ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र. ११ अ – ओबीसी (सर्वसाधारण), ११ ब – सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. १२ अ – अनुसूचित जाती (सर्वसाधारण), १२ ब – सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र. १३ अ – ओबीसी (महिला), १३ ब – सर्वसाधारण (महिला), १३ क – सर्वसाधारण
या सोडतीनंतर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगत आणखी वाढली असून, विविध राजकीय गटांकडून आगामी निवडणुकीसाठी तयारीला वेग आला आहे.
No comments