समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्याच्या स्टेटसची चर्चा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ ऑक्टोबर २०२५ - फलटण नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले असून सोशल मीडियावरही निवडणुकीचे परिणाम दिसू लागले आहेत. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक शरद दीक्षित यांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर "लवकरच विजयी गुलाल..." अशी पोस्ट व्हायरल करून, निवडणुकीच्या चर्चेमध्ये रंग भरला आहे.
शरद दीक्षित यांच्या या स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्याचा हा संदेश आगामी निवडणुकीत खासदार गटाकडून आत्मविश्वास दाखवणारा मानला जात आहे. नगराध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गात दोन नाईक निंबाळकर आमनेसामने येण्याची शक्यता असल्याने हा स्टेटस अधिकच अर्थपूर्ण ठरत आहे.
सध्या खासदार समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे, "फलटणमध्ये समशेरसिंह नाईक निंबाळकर विजयी गुलाल अंगावर घेणार" अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
No comments