सातारा गॅझेटच्या संदर्भातील तयारी राज्य शासनाने सुरू केली आहे - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती
सातारा दिनांक 4 प्रतिनिधी - मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देणाऱ्या हैदराबाद गॅझेटच्या संदर्भाचा जीआर सर्वसमावेशक पद्धतीने लागू होणार आहे .त्याच पद्धतीने सातारा गॅझेट चिकित्सक मुद्द्यांच्याद्वारे परिपूर्ण करून येत्या एक महिन्यात लागू करण्याचा शब्द मनोज जरांगे यांना दिला आहे .त्या संदर्भातील राज्य शासनाने तयारी सुरू केली असून उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे .अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
दरम्यान सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा साताऱ्यात मराठा समन्वयक समितीच्या माध्यमातून जंगी सत्कार करू कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाला एकदा नाही दोनदा आरक्षण दिले आहे पश्चिम महाराष्ट्रातील हा मराठा समाज त्यांचेही योगदान कधीही विसरणार नाही असे कौतुकोद्गार शिवेंद्रसिंह राजे यांनी काढले .मराठा समन्वयक समिती आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने येथील शिवतीर्थावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शाल श्रीफळ व फेटा घालून सत्कार करण्यात आला यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष कराड दक्षिण चे आमदार अतुल भोसले,कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक सदस्य शरद काटकर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
शिवेंद्रसिंह राजे भोसले पुढे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण देण्याची स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी घेतली आहे .ते ब्राह्मण प्रवर्गाचे आहेत म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही अशी भूमिका मांडली जात होती मात्र पहिल्या दिवसापासून देवेंद्रजी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी ठाम भूमिका घेतली .तत्कालीन 2019 च्या परिस्थितीमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिले होते आणि ते न्यायालयाच्या चिकित्सा प्रक्रियेवर टिकले सुद्धा होते महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ते रद्द करावे लागले . हैदराबाद गॅझेटच्या आधारे निघणारा जीआर यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून मिळणारे आरक्षण हेदुसऱ्यांदा मराठा समाजाला मिळत आहे याचे सारे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आहे . राजघराण्याचा सदस्य म्हणून खासदार उदयनराजे भोसले व माझ्यावर काहीजणांनी टीका केली होती मात्र टीका करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे तुम्ही मराठा समाजासाठी काय केले तुमच्या पक्षाने मराठा समाजासाठी काय केले याबाबतची मांडणी आपण कधी तपासली का ?असा जाहीर टोला शिवेंद्रसिंह राजे यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला .मराठा आरक्षणालाओबीसी समाजाचा विरोध होत आहे मात्र सातारा गॅझेटच्या आधारे आरक्षण मिळताना ओबीसी समाजाचे कोणतेही नुकसान होणार नाही ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे कायदेशीर दृष्ट्या चिकित्सक पातळीवर सातारा गॅझेटच्या संदर्भाने येणारा जीआर हा परिपूर्ण आणि कायद्याच्या पातळीवर टिकणारा असेल याबाबतची खात्री करूनच सर्वसमावेशक तिने तो लागू केला जाईल अशी स्पष्ट ग्वाही शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वतीने दिली . तसेच इतर मागास प्रवर्ग आणि मराठा समाज यांच्यात कोणताही वाद होणार नाही महाराष्ट्राला जातीय सलोख्याची मोठी परंपरा आहे आपण सर्वजणांनी आजपर्यंत सामोपचाराने एकमेकांना सांभाळून घेतले आहे मराठा आरक्षणाचा जीआर लागू झाल्यानंतरही हीच परंपरा कायम राहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी गेल्या वीस पंचवीस वर्षाची आहे मात्र मराठा समाजाचे अनेक नेते मुख्यमंत्री झाले परंतु कोणीही मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावला नाही तसेच आरक्षणाच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनाने ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्या संदर्भातही तातडीने ते गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रिये संदर्भात राज्य सरकार गंभीर आहे त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे .मराठा आरक्षणाचा संपूर्ण जीआर जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आपण साताऱ्यात जाहीर सत्कार घ्यावयाचा आहे अशी घोषणा शिवेंद्रसिंहराजे यांनी केली तसेच मनोज जरांगे यांचे सुद्धा शिवेंद्रसिंहराजे यांनी आभार मानले आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो त्यांनी या जीआर साठी अविरत संघर्ष केला असेही ते म्हणाले.
No comments