तब्बल 25 तासाच्या विसर्जन मिरवणुकीनंतर गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची सांगता
सातारा - पुढच्या वर्षी लवकर या ..चा जयघोष करत सातारा शहरातील प्रमुख गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक तब्बल 25 तासानंतर समाप्त झाली.
सातारा येथील सातारा नगरपालिकेच्या मध्यवर्ती गणेश मंडळाच्या मिरवणुकीला सायंकाळी साडेपाच वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. त्यानंतर अनेक मान्यवर मंडळच्यागणेश मूर्ती या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या आणि मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक आज रविवारी 12 वाजता मानाच्या शंकर-पार्वती गणेश मूर्तीचे विसर्जन तळ्यात विसर्जन झाल्यावर समाप्त झाली.
काल रात्री बारापर्यंत मंडळांच्या कडून दणदणाटाला उधाण आले होते.
यावर्षी प्रथमच मानाच्या पाच महागणपतीची आरती मध्यरात्री राजवाडा परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत करून या विसर्जन मिरवणुकीत एक वेगळाच आनंद उपस्थितांना मिळाला.
रात्री बारानंतर मंडळाच्या पुढील सर्व वाद्य तसेच हे सर्व प्रकार थांबून पोलिसांनी मंडळांना गणेश मूर्ती विसर्जनासाठी पुढे नेण्यासाठी घाई करण्यास सुरुवात केली .पावसात सायंकाळी सहा वाजल्यापासून राजवाडा ,मोती चौक, सदाशिव पेठ, राजपथ हा परिसर नागरिकांनी फुलून गेला होता. विविध मंडळांचे स्वागतासाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागत कक्षात उपस्थित होते. रात्री उशिरा अनेक कार्यकर्त्यांच्या मागणीवरून त्यांनीही मंडळाच्या पुढे स्वागत करून नाच करत ठेका धरला.
गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी व जोरजोरात सुरु असलेली वाद्य संगीत यामुळे या मिरवणुकीला एक वेगळाच नजारा प्राप्त झाला होता.
रात्री आठ ते बारा या वेळेत ही विसर्जन मिरवणूक अतिशय संथ गतीने पुढे, पुढे सरकत होती. मात्र रात्री बारानंतर वाद्य वाजवण्यास आणि थांबवण्यास पोलीस प्रशासनाने सांगितल्यानंतर या मिरवणुकीने विसर्जनासाठी वेग घेतला.
अनेक मंडळांच्या गणेश मूर्ती अतिशय महाकाय उंचीच्या असल्यामुळे त्या विसर्जन मिरवणूक मार्गावरून नेताना वारंवार अडथळे येत होते.
आज सकाळी 12च्या सुमारास शनिवार पेठेतील राहुल परदेशी यांनी बनवलेल्या व मानाच्या शंकर-पार्वती गणेशाची विसर्जन मिरवणूक विसर्जनाने संपन्न झाली.
तत्पूर्वी सकाळीच सातारा शहरातील मानाचा नवसाला पावणारा महासम्राट गणपती सदाशिव पेठ येथील पंचमुखी गणेश मंडळ अर्थात प्रताप मंडळ शनिवार पेठ येथील मान्यवर मंडळ तसेच मल्हार पेठ येथील मंडळाची मिरवणूक काढण्यात आली होती. अनेक अनेक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकी सहभागी होता आपापल्या पद्धतीने सायंकाळपर्यंत गणेश मूर्तींचे विसर्जन नेमून दिलेल्या विसर्जन तळ्यामध्ये केले .जिल्हा प्रशासनाने मिरवणूक मार्गावर सी.सी .कॅमेरे तसेच पोलिसांची फौज वाढवून आणि ठिकठिकाणी होमगार्ड व स्वयंसेवकांची मदत घेऊन हे मिरवणूक शांततेत पार पाडली. सातारा येथील बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मिरवणूक मार्गावर 24 तास कार्यरत असलेल्या सर्व पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना जागेवर जाऊन भोजन पॅकेट्स वितरण केले गेली 27 वर्षे ही परंपरा ट्रस्ट मार्फत राबविली जाते.
शनिवारी सकाळी मानाचा महागणपती सम्राट मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीने सुरुवात झालेली ही विसर्जन मिरवणूक तब्बल 25 तासानंतर म्हणजे रविवारी सकाळी पावणे बारा वाजता संपन्न झाली .या मिरवणुकीत सर्वात शेवटी शनिवार पेठ येथील नवसाला पावणारा मानाचा शंकर-पार्वती गणेशाची मूर्ती विसर्जन करून या विसर्जन सोहळ्याची सांगता झाली .
दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांच्या सह महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ढोल ताशाच्या तालावर मिरवणुकी दरम्यान स्वागत कक्षा पुढे नाचण्याचा आनंद लुटला. नगरपरिषदेच्या सातारा विकास आघाडीनेही कन्याशाळे नजीक भव्य मंच उभारून तेथून जाणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या .भारतीय जनता पक्ष आणि नगर विकास आघाडीच्या वतीने राजपथावर दर्शन शोरूम पुढे भव्य स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. सातारा शहरातील मान्यवर भाजपचे पदाधिकारी तसेच नगरसेवक यावेळी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत होते .रविवारी सकाळी मानाचे पाच गणपती विसर्जन करण्याकरता उशीर होत असल्यामुळे शनिवार पेठेतील शंकर पार्वती गणेशाची मूर्ती दर्शनासाठी राजवाडा परिसरातील मोती चौकात भाविकांसाठी ठेवण्यात आली होती. त्यामुळे रविवारी ही सकाळी अनेक सातारकर नागरिकांनी या शंकर पार्वती गणेशाचे मनोभावे दर्शन घेऊन आपल्या पुढील कामाला सुरुवात केली.
No comments