डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करून जलदगती न्यायालयात केस चालवावी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० ऑक्टोबर २०२५ - फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणाचा तपास एस आय टी मार्फत करून जलदगती न्यायालयात केस चालवावी तसेच आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपीना कठोरात कठोर शासन मिळावे अशी मागणी दहिवडी येथील महिलांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
दहिवडी येथील महिलांनी तहसीलदार यांना दिलेली निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ संपदा मुंडे यांची आत्महत्या ही दुर्दैवी व तितकीच संतापजनक घटना आहे, कारण एका अविवाहित डॉक्टर युवतीच्या व तिच्या कुटुंबियाच्या स्वप्नांचा आशा, आकांशाचा चक्काचूर झालेला आहे.
डॉक्टरच्या तक्रारीची पोलीस प्रशासनाने व आरोग्य विभागाने वेळीच दखल घेतली असती तर ही आत्महत्या टाळता आली असती.
जनतेचे रक्षण करणारे पोलीस अधिकारी भक्षक होऊन वागत असतील, आपले कर्तव्य पार पाडत असलेल्या डॉक्टरच्या कामात लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करीत असतील व आय टी इंजिनिअर असणारा तरुण शारीरिक व मानसिक शोषण करीत असेल तर या राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही. लोकशाही नावापुरती राहिली आहे, विकृती वाढत चालली आहे हे यातून सिद्ध होत आहे. ही घटना म्हणजे छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला कलंक आहे.
हे आत्महत्या प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे असून पीडितेला न्याय देण्यासाठी या प्रकरणाचा एस आय टी मार्फत तपास व्हावा व केस जलदगती न्यायालयात चालवावी व पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, प्रशांत बनकर सह या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपीना कठोरात कठोर शासन मिळावे.
 
 
.jpg)
.jpg) 
 
.jpg) 
 
.jpg) 
 
 
 
No comments