Breaking News

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा ४ फेब्रुवारी रोजी नागरी सत्कार

MP Ranjitsinh Naik Nimbalkar will be felicitated on February 4

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 2 - नीरा देवघर प्रकल्पाला निधी मंजूर केल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा नागरी सत्कार शनिवार दि.४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता गजानन चौक, फलटण येथे आयोजित केला असल्याची माहिती जयकुमार शिंदे,  बजरंग गावडे, अमोल सस्ते, अशोकराव जाधव यांनी दिली आहे.

    गेली अनेक वर्षे नीरा देवधर प्रकल्प रखडला होता, त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर करीत सुधारीत शासकीय मान्यता दिली, त्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खूप प्रयत्न केले होते, त्यामुळे भारतीय जनता पक्ष व सर्व शेतकऱ्यांनी,  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळवून दिल्याने त्यांचा भव्य असा नागरी सत्कार आयोजित केला असून, या सत्काराला  आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शहाजी बापू पाटील,आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,  ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेर सिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.

    शनिवार दि.४ रोजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्यात आल्यानंतर खंडाळा, लोणंद येथे भाजपा व शेतकरी त्यांचे स्वागत करतील, त्यानंतर सायंकाळी जिंती नाका फलटण येथे आल्यानंतर तेथून त्यांची भव्य  मिरवणूक निघेल व ते मलठण मधून गजानन चौक येथे उपस्थित राहतील. गजानन चौक येथे त्यांचा सर्वांच्या उपस्थितीत  नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

No comments