Breaking News

डॉ. मुकुल खुटाळे खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या फिजिओथेरपिस्ट पदी

Dr. Mukul Khutale as physiotherapist of Maharashtra team in Khelo India tournament

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -   केंद्र सरकारच्या क्रीडा विभागा मार्फत "पाचव्या खेलो इंडिया गेम्स मध्य प्रदेश २०२२" अंतर्गत मध्य प्रदेश भोपाळ येथे विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

          खेलो इंडिया स्पर्धेत स्पर्धेमधील महाराष्ट्र संघाच्या, कानोईग अँड कयाकिंग या खेळ प्रकारासाठी, आयुक्त, क्रीडा व युवकसेवा संचलनालय पुणे यांच्याकडून फलटण तालुक्याचे सुपुत्र डॉ. मुकुल महेश खुटाळे यांची फिजिओथेरपिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

        डॉ. मुकुल खुटाळे यांनी यापूर्वी हॉकी दिल्ली संघाचे फिजिओथेरपिस्ट म्हणून काम पाहिलेले असून, भारतीय खो - खो संघाच्या फिजिओथेरपीस्ट पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.

       डॉ. मुकुल खुटाळे यांची महाराष्ट्र संघाच्या फिजीओथेरपीस्ट पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी विधान परिषद माजी सभापती  व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व विविध स्तरावरील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

No comments