श्रीमंत रामराजे यांच्या शुभहस्ते फलटण शहरातील विविध विकास कामांची उदघाटने
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० ऑक्टोबर २०२५ - रविवार, दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं.०५ वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्रमांक २, पाचबत्ती चौक, फलटण येथील शाळा इमारतीचे उदघाटन तसेच सभापती निवास ते संतोष वेलणकर घर रस्ता कामाचा शुभारंभ, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दिपकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून नाबार्ड योजना निधीतून बांधण्यात आलेल्या बाणगंगा नदीवरील दत्तघाट बॉक्सपुल उदघाटन तसेच बाणगंगा नदीवरील रिटेनिंग वॉलचे उदघाटन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून, याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार दिपकराव चव्हाण हे भूषविणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ.निताताई नेवसे यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती प्रभाग क्रमांक ०६ चे माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी दिली आहे. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन उदघाटन, भूमिपूजन कार्यक्रमानंतर शनिनगर बाग, फलटण येथे करण्यात आले आहे. गेली ३५ वर्ष फलटण नगर परिषदेची सत्ता श्रीमंत रामराजे यांच्या विचाराची राहिली असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली ४ वर्षे लांबलेल्या आहेत. या निवडणुका आता लवकरच होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर काय बोलणार याची उत्सुकता फलटण शहरातील नागरिकांना लागून राहिली आहे. तरी सदरच्या कार्यक्रमाला फलटण शहरातील व परिसरातील नागरिकांनी बहुसंख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व माजी नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी केले आहे.

No comments