भाडेवाढ विरोधात २ दिवस गाळे बंद ; प्रांताधिकारी - तहसीलदार यांना आंदोलनाकडे येण्यास वेळच नाही - ॲड.नरसिंह निकम
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० ऑक्टोबर २०२५ - एकोणीस दिवस झाले बाजार समितीच्या गाळे भाडेवाढ विरोधात साखळी उपोषण सुरू आहे, मात्र बाजार समिती प्रशासन अथवा तहसीलदार, प्रांताधिकारी यांना आमच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही, त्यामुळे आता दोन दिवस संपूर्ण गाळे बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करीत, न्याय मिळाला नाहीतर शहरातील व्यपाऱ्यांशी चर्चा करून शहरातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचा इशारा फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड.नरसिंह निकम यांनी दिला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण च्या गाळा धारक यांचे साखळी उपोषण येथील अधिकारी गृहासमोर सुरू असून, ऊन वारा पाऊस झेलत आज तब्बल एकोणीस दिवस झाले, हे संविधानिक मार्गाने साखळी उपोषण सुरू आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी निकम बोलत हो.
ते यावेळी बोलताना ॲड.निकम यांनी सांगितले की तहसीलदार ते मुख्यमंत्री यांच्यापर्यंत आम्ही निवेदने दिली, मात्र अद्यापही कोणता तोडगा निघाला नाही, तसेच ज्यांच्याकडे कोणताही तोडगा निघणार नाही, त्याचं नाव आम्हाला सांगितले जाते, परंतु ज्यांनी हा तोडगा काढायचाय त्यांनीच जाणून बुजून या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे.
आता त्यामुळे दोन दिवस संपूर्ण गाळे बंद ठेवण्यात येणार आहेत, त्याचबरोबर त्या नंतर या अन्यायाविरोधात संपूर्ण फलटण शहर बंद करण्यात येणार आहे असे ॲड.निकम यांनी सांगितले,ते सांगत आहेत की भाडेवाढ बरोबर आहे, तर मग तुम्ही बायलॉज घेऊन या अन् दाखवा ते कसं बरोबर आहे ते, पण तुम्हालाच कायदे माहिती नाहीत तर तुम्ही कसे पुढे येणार? जे भाडे आहे त्याला जीएसटी लागू नसताना, तो घेतला जात आहे,संकलित कर भुईभाडे सबंधित बाजार समिती भरते इथ फलटण मध्ये मात्र गाळाधारक भरतात असे ही निकम यांनी स्पष्ट केले.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळाधारक यांची चर्चेसाठी मीटिंग बोलावली अन् सह्या घेतल्या अन् त्यांनी नंतर भाडेवाढीचे प्रोसेडिंग लिहिले असा गौप्यस्फोट करीत त्या सह्या फसवून घेतल्या आहेत, त्याच्या आम्ही तक्रारीही केल्या आहेत,तुम्ही कारखाना भाड्याने दिला तर एखाद्याने गाळा भाडेपट्ट्यावर दिला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा की असेही ॲड.नरसिंह निकम यांनी सांगितले. यावेळी गाळाधारक उपस्थित होते.

No comments