Breaking News

विकास कामावर विश्वास ठेवून युवकांचे भाजपमध्ये प्रवेश होत आहेत - मा.खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर

Youth are joining BJP with faith in development work - Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ सप्टेंबर २०२५ - फलटण तालुक्यांमध्ये विकासाचे पर्व सुरू झालेले आहे, गेली तीस वर्षे हा तालुका विकासापासून वंचित होता, या तालुक्यातल्या जनतेला व युवकांना या गोष्टी समजायला लागलेल्या आहेत, त्यामुळे या तालुक्यातील युवक हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. खास करून सोनवडीच्या युवकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो. भविष्यात सोनवडीच्या विकासाला निधी कमी पडून देणार नाही. सोनवडी हे गाव एमआयडीसीच्या रस्त्यावरचे गाव असल्यामुळे या गावाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. या भागातली युवकांना नक्कीच फायदा होईल. व रोजगार निर्माण होतील तसेच लवकरच या भागात निरादेवघर चे पाणी येणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी समृद्ध होईल. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या  भागाने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावं असा आवाहन रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

    राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोनवडी येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये सोनवडीतील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, याप्रसंगी माजी खासदार रणजीत हे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर , पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे , संतकृपा उद्योग समूहाचे चेअरमन विलासराव नलवडे,  मंडल अध्यक्ष लक्ष्मण सोनवलकर, संजय देशमुख , विकास नाळे,  उदयसिंह निंबाळकर, सोनवडीचे सरपंच बाळासाहेब शिंदे, धनंजय मोरे, नाना आडके उपस्थित होते.

    भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्याकडे कोळकी जिल्हा परिषद गटातील  जे उर्वरित प्रश्न राहिलेले आहेत ते सोडवण्याची विनंती केली . नवीन जिल्हा परिषद मतदार संघ मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. युवकांनी रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्यावर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे त्यामुळे त्यांचा सन्मानच केला जाईल. त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायमच राहिल.

    यावेळी माणिकराव सोनवलकर यांनी मार्गदर्शन करत या भागातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही सगळे उभे आहोत असे सांगितले.

    यावेळी माजी सरपंच बाळासाहेब शिंदे व धनंजय मोरे , यांनी सर्वांचं स्वागत केलं. यावेळी सुनील सूर्यवंशी सर यांनी प्रस्तावित केले .तर यावेळी सोनवडीचे संदीप सोनवलकर , राजन खिलारे , यशवंत जाधव, प्रदिप भरते, किरण लाळगे  नितीन चतुरे , अभिजित चतुरे, सादिक शेख यावेळी उपस्थित होते.

    या वेळी सोनवडी बुद्रुक येथील  कार्यकर्त्यांनी पांडुरंग आडके ,सुरेश चव्हाण, नवनाथ आडके, शंकर आडके, मंगेश आडके ,ऋषिकेश आडके, देविदास मोरे, मयूर आडके ,रवी आडके या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

No comments