Breaking News

फलटण जिंती नाका येथे गणेश मंडळातील युवकांमध्ये दगडफेक, 14 जणांना अटक

Stone pelting among youths in Ganesh Mandal at Phaltan Jinti Naka, 14 people arrested

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ सप्टेंबर २०२५ - फलटण शहरात जिंती नाका येथे दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन गणेश मंडळातील युवकांमध्ये वाद होऊन दगडफेकीची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली असून एकजण फरार आहे. याप्रकरणी एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवशक्ती गणेशोत्सव मंडळ व जयभवानी गणेशोत्सव मंडळातील युवकांमध्ये किरकोळ वाद झाला. पोलिसांनी मध्यस्थी करून, "भांडण करू नका, तक्रार असल्यास पोलीस ठाण्यात या," असे समजावून सांगितले. मात्र संबंधित युवकांनी पोलिसांचे काहीही न मानता एकमेकांवर दगडफेक करून सार्वजनिक शांततेचा भंग केला.

    या घटनेत पोलिसांनी कारवाई करत, विशाल पांडुरंग माळी (३०), देविदास बापू माळी (२५), संपत भरत माळी (२४), अजय पांडुरंग माळी (२९), रंगराव भरत माळी (२७), अमर राजू माळी (३०), नेताजी प्रकाश माळी (२८), प्रकाश काळुराम माळी (५०), अमोल आकाराम मोरे (२२), रमेश संजय माळी (२५), अजय रघुनाथ माळी (३२), विधी संघर्षग्रस्त बालक (१६), सुशांत सुनिल जुवेकर (१८), शंकर रामराव जुवेकर (३०) यांना ताब्यात घेतले. तर अजय संजय जाधव (२५) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

    सदर गुन्हा भा.न्या.सं. कलम १९४(२) अन्वये नोंदविण्यात आला असून तपास म.पो.हवा. अश्विनी चव्हाण करीत आहेत.

No comments