डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणात गोपाळ बदने व प्रशांत बनकर यांना पोलीस कोठडीचे हक्क राखून न्यायालयीन कोठडी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने व प्रशांत बनकर दोघांची पोलीस कोठडी आज संपल्याने, दोघांना फलटण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने बदने व बनकर यांना पोलीस कोठडीचे हक्क अबाधित राखून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.
फलटण डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात पोलीस चौकशी करत आहेत, तर दुसरीकडे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये याप्रकरणात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या संशयित आरोपींची आज पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना आज फलटण न्यायालयात हजर केले असता, त्यांना आज न्यायालयाने पोलीस कोठडीचे हक्क अबाधित राखून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दोघांना सातारा कारागृहात हलवण्यात येणार आहे.
.jpg)
No comments