फलटणमध्ये कै. डॉ. संपदा मुंडे यांना श्रद्धांजली; दि. १ नोव्हेंबर रोजी कँडल मार्च
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० ऑक्टोबर २०२५ - फलटण तालुक्याच्या जनतेच्या वतीने कै. डॉ. संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कँडल मार्च गजानन चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा येथे होणार असून, डॉ. मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था व विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
फलटण तालुक्याच्या जनतेने एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
.jpg)
No comments