रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची फलटण येथे खुली पत्रकार परिषद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १ नोव्हेंबर २०२५ - फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्त्या प्रकरण राज्यात गाजत असताना या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे व त्यांचे स्वीय सहाय्यक यांचे नाव विरोधकांकडून पुढे करण्यात येत आहे तसेच विरोधी पक्षातील सुषमा अंधारे व मेहबूब शेख यांनी थेट आरोप केले होते, या आरोपांना उत्तर देण्यासाठी मा खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील गजानन चौकात दि ३ नोव्हेंबर रोजी खुली पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
विरोधकांकडून रणजितसिंह यांना घेरण्याचा प्रयत्न केला गेला होता, यावेळी त्यांचे कार्यकर्ते आक्रमक होत, या विरोधकांना उत्तर देत होते, त्या मुळे रणजितसिंह यांनी सामाजिक माध्यमांवर आपण संविधानिक मार्गाने उत्तर देऊ असे आवाहन केले, यानंतर जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील यांनी रामराजे यांचे नाव घेऊन, हे षडयंत्र रचल्याचा घणाघाती आरोप केला.
दि ३ नोव्हेंबर रोजी सुषमा अंधारे फलटणला येणार असून याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता खुली पत्रकार परिषद आयोजित केल्याचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी सांगितले यावेळी त्यांनी सुषमा अंधारे , मेहबूब शेख , आमदार रामराजे निंबाळकर यांना त्यांनी या पत्रकार परिषदेत येऊन म्हणणे मांडण्याचे व प्रश्न विचारण्याचे खुले आवाहन त्यांनी केले आहे.

No comments