गणपती विसर्जन मिरवणुक मार्गाची महावितरणकडून पाहणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ सप्टेंबर २०२५ - गणपती विसर्जन मिरवणुक मार्गाची एचटी / एलटी लाइन पाहणी करून ज्या लाईन खाली आहेत त्यांच्या नियोजनासह विसर्जन मिरवणुकीत येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना महावितरण फलटण विभागातर्फे गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करताना कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये यांनी दिल्या.
याप्रसंगी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, फलटण शहर बी. आर. लोंढे, शाखा अभियंता फलटण शहर-1 दिनेश जोनवाल, शाखा अभियंता रविंद्र ननवरे उपस्थित होते.
या पाहणी दरम्यान कार्यकारी अभियंता ग्रामोपाध्ये यांनी स्वतः संपूर्ण मार्गावर पायी चालत जाऊन सर्व स्थितीचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी विद्युत तारा खाली लोंबत असल्याचे किंवा विसर्जन मिरवणुकीत अडथळा होण्याची शक्यता असल्याचे दिसले, त्याठिकाणी तत्काळ योग्य नियोजन करण्याच्या स्पष्ट सूचना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी महावितरण स्टाफ तसेच महावितरण गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर ज्योतिराम दडस, नितीन भगत, विशाल कणसे, सचिन निंबाळकर उपस्थित होते.
No comments