बुद्धिबळ स्पर्धेत सद्गुरू शिक्षण संस्थेचे घवघवीत यश
कोळकी (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ सप्टेंबर २०२५ - राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने फलटण तालुका स्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे आयोजित करण्यात आले. सदर स्पर्धेचे उद्घाटन मा.प्राचार्य रवींद्र येवले सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे मॅडम उपस्थित होत्या. तसेच फलटण तालुका शारीरिक शिक्षक संघटनचे अध्यक्ष दशरथ लोखंडे उपस्थित होते.
बुद्धिबळ स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक संदीप ढेंबरे यांनी काम पाहिले,या स्पर्धा वय वर्ष 14 वयोगट 17 वयोगट व 19 वयोगट मुले अशा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी 110 खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर फलटणचे 14 वर्षे वयोगटांमध्ये श्रीनाथ निंबाळकर व निरंजन येळे तर सहकार महर्षी हण मंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणचे 14 वर्षे वयोगटात आर्यन खरात, 17 वर्षे वयोगटात गौरव बोराटे , 19 वर्षे वयोगटात संकल्प सस्ते व रुद्र प्रताप जाधव यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, संस्थेचे अध्यक्ष तुषारभाई गांधी, संस्थेच्या सचिव ॲड.सौ. मधुबाला भोसले, संस्थेच्या प्रशासकीय संचालिका सौ. स्वाती फुले मॅडम, आनंदवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण सर, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापकनागेश पाठक सर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments