फलटण येथे राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ सप्टेंबर २०२५ - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री दीनेश अहीवळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राजे उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटीशाविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्य क्रांतीकारक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रथम सशस्त्र क्रांतीकारक मानले जात, पहिल्या ऊठावाद्वारे इग्रजांना सळो की पळो करून सोडणारे व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आध्यक्रांतीकारक ठरले होते.
यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष श्री सनी कदम, श्री उदय काकडे, श्री महेन्द्र काकडे, श्री राजेंद्र गोडसे श्री देवा चव्हाण , श्री प्रेम काकडे ,श्री बापु मदने, श्री कीशोर मोरे , प्रशांत अहीवळे श्री राजेंद्र माने, श्री प्रमोद चव्हाण, श्री अक्षय अहीवळे, श्री धनंजय सोनवलकर, श्री अक्षय लोंढे श्री संजय मोरे, श्री दादा काकडे, श्री योगेश पोरे , श्री राजाभाऊ देशमुख, श्री सुरेश कोलवडकर, श्री कीशोर अहीवळे, श्री वीजय अहीवळे, श्री नीलेश रीटे, श्री रत्नेश्वर निकाळजे , श्री बाळासाहेब मोरे,संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
No comments