ओबीसी आरक्षण बचाव समितीचा साताऱ्यात मोर्चा
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ सप्टेंबर २०२५ - मराठा आरक्षण राज्य सरकारने जाहीर केल्याच्या मुद्द्यावर ओबीसी समाजाचा विरोध वाढला आहे .साताऱ्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या शासनाच्या जीआर विरोधात ओबीसी बचाव समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले .यावेळी साताऱ्यात शिवतीर्थ पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयावर असा मोर्चा काढण्यात आला.
महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बीके यादव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला . शासनाने नुकताच मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेट जीआर काढण्याचा निर्णय घेतला आहे हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक बेकायदेशीर व असंविधानिक असल्याची ओबीसी समाजाची भावना आहे याबाबत राज्य शासनाने लक्ष वेधण्यात आले .या शासन निर्णयाचा निषेध म्हणून ओबीसी बचाव कृती समितीने आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनामध्ये ओबीसी बचाव समितीचे शंभर आंदोल क सहभागी झाले होते .सकाळी दहा वाजता हा मोर्चा साताऱ्यातून काढण्यात आला तसेच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले व मराठा आरक्षणाच्या संदर्भातील आणि जीआर तत्काळ मागं घ्यावा अशी मागणी करण्यात आली.

No comments