Breaking News

जयश्री आगवणे साधुसंत नाहीत ; रणजितसिंह यांच्याविरुद्ध बदनामीचे षडयंत्र - अनुप शहा व सुनीता आगवणे

Jayashree Agavane is not a saint; Conspiracy to defame Ranjit Singh - Anup Shah and Sunita Agavane

    फलटण गंधवार्ता वृत्तसेवा  दि. ३० ऑक्टोबर - जयश्री आगवणे व दिगंबर आगवणे यांच्या अनैतिक प्रेम प्रकरणाची माहिती जयश्री चे सासरे जनार्दन आगवणे यांना झाली, जनार्दन आगवणे हे या प्रेम प्रकरणात अडसर ठरत असल्याने त्यांनी त्यांचा खून केला असल्याचा आरोप करतानाच सध्या राजकीय विरोधकांकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे फलटण येथील पत्रकार परिषदेत जयश्री आगवणे यांच्या नणंद सुनिता जनार्दन आगवणे व अनुप शहा यांनी केला.

    आज वास्तविक असे चित्र उभे केले जात आहे की, जयश्री आगवणे यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर अन्याय केला जातोय, त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे पण वस्तुस्थिती वेगळी असून, त्यांनी अनेक पापं केली असून, त्यांनी केलेल्या चुकीच्या कामांमुळे व अन्याया मुळे तीन ते चार जीव गेले आहेत, वास्तविक जयश्री आगवणे कोणी साधू संत नसून त्या चोर आहेत. त्यांनी त्यांच्या घराशेजारील लोकांची मंगळसूत्र चोरली आहेत. म्हणून त्यांना फलटणला गावी आणून ठेवण्यात आलं. गावी आणल्या नंतर जयश्री यांनी त्यांचे दिर दिगंबर आगवणे यांच्या बरोबर अनैतिक सबंध ठेवून संतोष आगवणे यांना फसवले असल्याचा आरोप अनुप शहा यांनी केला.

    पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक अनुप शहा यांनी जयश्री आगवणे यांचा पर्दाफाश करत, जयश्री आगवणे व शरद पवार , जयश्री आगवणे व धैर्यशील मोहिते पाटील , दिगंबर आगवणे व रामराजे , मेहबूब शेख व रघुनाथराजे यांचा फोटो सादर करून, जयश्री आगवणे, सुषमा अंधारे व मेहबूब शेख हे  रणजितसिंह यांच्या बदनामीसाठी रसद घेऊन काम करत असल्याचा आरोप अनुप शहा यांनी केला.

No comments