डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणात गोपाळ बदने व प्रशांत बनकर यांना १ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी
फलटण गंधवार्ता वृत्तसेवा दि. ३० ऑक्टोबर - फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपी निलंबित पोलीस निरीक्षक गोपाळ बदने व प्रशांत बनकर दोघांची पोलीस कोठडी आज संपल्याने, दोघांना फलटण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने बदने व बनकर यांना १ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
आरोपींच्या मोबाईल ,पेनड्राइव्ह व लॅपटॉप यांच्यातील माहितीचे विश्लेषण करणे बाकी असून आरोपींकडून अजून काही माहिती मिळवण्यासाठी आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सरकारी वकील सरकारी वकील ॲड क्षमा बांदल यांनी केली.
निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांचे वकील ॲड धायगुडे यांनी, बचाव करताना आरोपी पोलिसांकडे स्वतःहून हजर झाला होता, पीडिता यांच्या बहिणीने स्वतःच तिच्या तळ हातावरील हस्ताक्षर तिचे नसल्याचे सांगितल्याने हा पुरावा ग्राह्य धरू नये तसेच आरोपीचा मोबाईल व तीन पेन ड्राइव्ह पोलिसांकडे आहेत, त्यामुळे नवीन कोणतीही चौकशी बाकी नाही असा युक्तिवाद केला.
प्रशांत बनकर यांचे वकील ॲड सुनील भोंगळे यांनी आरोपीला दि २५ पासून दि ३० पर्यंत कोठडी दिली होती, या काळात प्रशांत बनकर यांचा लॅपटॉप व मोबाईल पहिल्या दिवसापासून पोलिसांनी ताब्यात घेतला असून यामध्ये नव्याने काही माहिती मिळवण्यासाठी आरोपीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद केला.
यावेळी या दोघांना प्रतिवाद करताना सरकारी वकील ॲड क्षमा बांदल यांनी हातावरील हस्ताक्षर हे हस्ताक्षर तज्ञ यांच्याकडे पाठवले जाईल त्यांचा अहवाल आल्यावर या बाबत निर्णय व्हावा तसेच दोन्ही आरोपींकडे अजूनही काही माहिती मिळू शकते यासाठी पाच दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी केली.
    दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जे. एस. खेडकर गोयल यांनी  गोपाळ बदने व प्रशांत बनकर यास १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
 
 
.jpg)
.jpg) 
 
.jpg) 
 
.jpg) 
 
 
 
No comments