सुषमा अंधारे व आगवणे यांच्या विरोधात ५० कोटी रुपयांची मानहानी नोटीस, आरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा - ॲड. धीरज घाडगे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २९ ऑक्टोबर २०२५ - माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोणत्याही व्यक्ती किंवा मुकादम यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल केला नाही, सुषमा अंधारे यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे व दिशाभूल करणारे असल्याचे सांगून, माजी खासदार रणजितसिंह नाईक यांच्या वतीने पन्नास कोटी रुपयांची अब्रु नुकसानीची नोटीस अंधारे यांना बजावली असून, अंधारे यांनी आरोप सिद्ध करावे अन्यथा 48 तासांच्या आत जाहीर माफी मागावी असे ॲड. धीरज घाडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप केल्यानंतर फलटण येथे ॲड. धीरज घाडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याच प्रत्युत्तर दिले यावेळी ॲड नरसिंग निकम ॲड सचिन शिंदे उपस्थित होते.
सुषमा अंधारे व जयश्री आगवणे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 277 गुन्हे दाखल केले आहेत असे सांगितले, त्याला उत्तर देताना ॲड. धीरज घाडगे, ॲड. नरसिंह निकम,व ॲड. सचिन शिंदे यांनी त्या आरोपांना सडेतोड उत्तर देत सर्व आरोप धुडकावून लावले, यावेळी ॲड. धीरज घाडगे यांनी सांगितले की उपविभागीय पोलीस अधीक्षक फलटण यांनी दिलेल्या लेखी माहितीनुसार/पत्रानुसार आजपर्यंत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोणत्याही पोलीस ठाण्यात व कोणाही विरोधात एकही आरोप/ दावा/गुन्हा दाखल केलेला नाही असे स्पष्ट केले.
तसेच ही पत्रकार परिषद नक्की त्या डॉक्टर युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी घेतली का ? दिगंबर आगवणे यांच्यासाठी घेतली? असा प्रश्न उपस्थित करीत, तुम्ही ज्यांच्या शेजारी बसला आहात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, ते कोणकोणते याची तुम्ही माहिती घ्या व केलेल्या सर्व आरोपबद्दल माफी मागा व ज्या ठिकाणी तुम्ही पत्रकार परिषद घेतली तिथंच सर्व आरोप मागे घ्या अशीही मागणी केली आहे.
त्या डॉक्टर चा प्रकरणाचा आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा काहीही संबंध नाही, तसेच आजपर्यंत एकाही ऊस मुकदामाकडून त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे स्पष्ट केले.
    ज्या दिगंबर आगवणे यांच्या बाजूने पत्रकार परिषद घेतली त्यांनी अनेक बॅंकांना बुडवल्या असल्याचा आरोप असून तसे गुन्हे दाखल आहेत असे ॲड. घाडगे यांनी स्पष्ट केले.
 
 

 
 
.jpg) 
 
.jpg) 
 
 
 
No comments