Breaking News

फलटणमध्ये अज्ञात इसमाचा बेवारस मृतदेह आढळला ; ओळख पटविण्याचे आवाहन

Unclaimed body of unknown person found in Phaltan; Appeal to identify

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२० -: फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात इसमाचा बेवारस मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

    फलटण शहर पोलीस ठाण्यात बेवारस मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हा मृतदेह सोमवार पेठ येथील स्मशानभूमी परिसरात आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती अंदाजे ३५ वर्षे वयाचा असून उंची सुमारे ५ फूट आहे. रंग सावळा, केस काळे पांढरे तसेच दाढी वाढलेली आहे.

    मृत व्यक्तीच्या अंगात काळ्या-निळ्या रंगाचा चौकडीचा फुलशर्ट, काळ्या रंगाची जिन्स पँट होती. उजव्या हातावर देवाचे गोंदलेले चित्र असून, चेहऱ्यावर किरकोळ जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

    दि. ०६ मे २०२६ रोजी सकाळी हा मृतदेह आढळून आला असून, पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. परिसरातील नागरिकांना मृत व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास फलटण शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ए. पी. घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No comments