फलटणमध्ये १८ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा; नागरिकांना सहकार्याचे आवाहन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ जून २०२६ : उन्हाळ्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आणि धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने फलटण शहराला पाणीपुरवठा करणारा निरा उजवा कालवा १२ जून २०२६ पासून बंद करण्यात आला आहे. हा कालवा सुमारे ४५ दिवस बंद राहणार असल्याने नगरपरिषदेच्या साठवण तलावातील उपलब्ध पाणीसाठा संपूर्ण कालावधीसाठी पुरेसा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या परिस्थितीमुळे फलटण नगरपरिषदेने १८ जून २०२६ पासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्याधिकारी (गट-अ) निखील जाधव यांनी जाहीर प्रकटणाद्वारे नागरिकांना माहिती दिली असून पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक :
दि.१८, २०, २२, २४, २६, २८ व ३० जून २०२६
पेठ सोमवार संपूर्ण भाग
पेठ मंगळवार संपूर्ण भाग
पेठ महतपुरा
जिंती नाका संपूर्ण भाग
दि.१९, २१, २३, २५, २७ व २९ जून २०२६
फलटण शहरातील उर्वरित संपूर्ण भाग
नगरपरिषदेकडून नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळून आवश्यक तेवढाच वापर करण्याचे तसेच एक दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नियोजनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments