बोरगावचा तलाठी लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
सातारा (प्रतिनिधी) हक्क सोड पत्राची दस्तावर नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेणाऱ्या बोरगाव तालुका कोरेगाव येथील तलाठी रणजीत अर्जुन घाटेराव वय 32 सध्या राहणार श्री अपार्टमेंट अहिरे कॉलनी लक्ष्मी नगर सातारायाला सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे . प्राप्त माहितीनुसार तक्रारदार यांची मौजे टकले तालुका कोरेगाव येथे गट नंबर 100 मध्ये 90 गुंठे शेत जमीन आहे दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी तक्रारदारांच्या वडिलांचे निधन झाले . तक्रारदारांची भाऊ-बहीण स्वतः तक्रारदार यांची नावे सातबारावर नोंद झाली होती . तक्रारदार यांच्या बहिणीचे विना मोबदला हक्क सोड पत्र तसेच भावाच्या नावे नोंद सह दुय्यम निबंधक सातारा यांची समोर करून देण्यात आली होती . या हक्क सोडपत्राची नोंद सातबारा सादरी करून देण्यासाठी तलाठी घाटेराव यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपये लाच मागितली त तडजोडीअंती 1000 रुपये रोख देण्याचे ठरले व उर्वरित रक्कम नंतर देण्याचे चर्चेनुसार निश्चित झाले.
मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी तक्रारदारांच्या फिर्यादीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक राजेश वाघमारे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक सुनील पाटील आणि त्यांच्या पथकाने तलाठी सजा परिसरात सापळा रचला आणि तलाठी घाटेराव यांना एक हजार रुपयाची लाच घेताना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले . त्यांच्या विरोधात रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे . पोलीस हवालदार नितीन गोगावले सत्यम थोरात अजय राज देशमुख आणि निलेश राजपुरे यांनी भाग घेतला होता.
No comments