विसर्जन मिरवणूक बेफाम डीजे वर कारवाई होणार का? पोलिसांनीही मिरवणुकीत वाजवला डीजे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० सप्टेंबर २०२५ -फलटण पोलिसांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीसांनी डीजे लावला होता. पोलिस प्रशासनच नियम धाब्यावर बसवत असल्याने डीजे वरील कारवाईची शक्यता धूसर झाली आहे. यंदा गणेश विसर्जन मिरवणुकी पूर्वी फलटण पोलिसांनी नियमबाह्य डीजे वाजवाल तर कारवाईला होणारच, असे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. यावेळी कोणत्या कोणत्या कलमा खाली कारवाई केली जाईल हे ही अधोरेखित करून सांगितले होते. फलटणच्या पोलिसांनी कारवाई करावी यासाठी सामाजिक माध्यमांवर घेतलेल्या मतदानात ७३ टक्के नागरिकांनी कौल दिला होता, प्रत्यक्षात विसर्जन मिरवणुकात कर्कश आवाजात बेफाम डीजे वाजत होते, आता पोलीस यावर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
गणेश मिरवणुकीत वाजलेले डीजे एवढेच कमी होते, म्हणून की काय पोलिसांनी पोलिस ठाण्यातील गणपती बाप्पांचे विसर्जन करताना फलटण पोलिस ठाण्यापासून निघालेल्या मिरवणुकीत स्वतःच डीजे लावून कर्णकर्कश गाण्यांवर नाचण्यासाठी ताल धरला होता हे पाहून नागरिकांनी मात्र कपाळावर हात मारला कारण काल पर्यंत डीजे वर कारवाई करण्याच्या वलग्ना करणाऱ्या पोलिसांना मिरवणुकी साठी डीजे लावण्याची कुबुद्धि बाप्पाने कशी काय दिली कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनीच डीजे दणदणाट करून कायद्याचा भंग केला आहे.
फलटण पोलिसांनी डीजे व लेझर लाईट विरुद्ध कारवाई करण्याची घोषणा हवेतच विरली असून, उलट दुसऱ्या दिवशी स्वतःच डीजे च्या तालावर आवाजाची मर्यादा पायदळी तुडवली असून, यापुढे आजून काय काय पहायला मिळणार आहे अशी विचारणा फलटणच्या नागरिकांनी केली आहे. एकीकडे पोलिसांनी डीजे व लेझर लाईट विरुद्ध कारवाई करण्याची घोषणा केली दुसरीकडे डीजे जोरदार वाजले व लेझर लाईट जोरदार झळकल्या त्यामुळे फलटण शहर पोलिसांची घोषणा फक्त दाखवण्यासाठी होती हे स्पष्ट झाले आहे.
फलटण शहरातून निघालेली पोलिसांची गणपती विसर्जन मिरवणुकीत वाजलेले डीजे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. रिंग रोड परिसरात चक्क अनेक नागरिक डोक्यावर हात मारून पोलिसांची निघालेली मिरवणूक पाहत दबक्या आवाजात सवाल विचारत होती. पोलिस प्रशासनच नियम धाब्यावर बसवत असल्याने डीजे वरील कारवाईची शक्यता धूसर झाली आहे.
No comments