खामगाव येथील आदिवासी बांधवांचे अनेक वर्षांपासूनचे घरकुलाचे स्वप्न साकार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ - खामगाव (ता. फलटण) येथील कातकाडी वस्तीतील आदिवासी समाजातील नागरिकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला घरकुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, प्रधानमंत्री "जन मन घरकुल योजने"अंतर्गत जागेसहित घरकुल बांधून त्याचे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात पार पडले.
या योजनेचा पाठपुरावा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सचिन पाटील यांनी सातत्याने केला होता. विधानसभेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनाला न्याय देत त्यांनी शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला व अखेर आज हा महत्वाकांक्षी उपक्रम यशस्वीपणे पूर्णत्वास गेला.
लोकार्पणप्रसंगी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले, "लोकसेवेचे कार्य पूर्ण झाल्यानंतर जो आनंद मिळतो, तो इतर कोणत्याही गोष्टीत मिळू शकत नाही. मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून नेहमी जनतेच्या पाठीशी उभा राहणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या, कुठे अडचण असेल तर आमच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करा. तुमचे काम मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
या कार्यक्रमाला प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, गटविकास अधिकारी सतीश कुंभार, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, महानंदचे माजी उपाध्यक्ष डी. के. पवार, युवा नेते विक्रम आप्पा भोसले, सिराज भाई शेख, अमोल खराडे, राजेंद्र कुचेकर, गणेश पिसे यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments