रामचंद्र काळे आदर्श लेखक-साहित्यिक पुरस्काराने सन्मानित
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ ऑगस्ट २०२५ - ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड येथे ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित "भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळा 2025" उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील वडले (ता. फलटण) येथील श्री रामचंद्र भिवाजी काळे यांना "आदर्श लेखक/साहित्यिक" म्हणून सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण तुकाराम बाबा महाराज (मठाधिपती, संत बागडे बाबा आश्रम, जत), मा. वैशाली चव्हाण (सहाय्यक आयुक्त, पुणे मनपा), अति. पोलीस आयुक्त श्री. श्रीराम मांडुरके, अभिनेत्री प्राजक्ता मालुंजकर, आंतरराष्ट्रीय मॉडेल श्वेता परदेशी, व मिस इंडिया - खानदेश ममता भोई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत असून, सातारा जिल्हा, रा.प. सातारा विभाग व फलटण तालुक्यातून त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली जात आहे. यापूर्वी त्यांना सामाजिक, शैक्षणिक ,साहित्यिक, कला, आरोग्यविषयक, ऐतिहासिक गोष्टींची दखल घेऊन त्यांना पुढील 10 राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, कला आणि आरोग्यविषयक योगदानामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
No comments