श्री सद्गुरु हरिभाऊ महाराज सहकार प्रशिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी ॲड. शितल अहिवळे तर व्हा. चेअरमनपदी रविंद्र बेडकिहाळ सर यांची निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ ऑगस्ट २०२५ - सहकार वाढवण्यासाठी चालवण्यासाठी व सहकाराची उद्दिष्ट गाठण्यासाठी सहकार क्षेत्रातील सर्व घटकांना प्रशिक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे, तरच सहकाराला चालना मिळून तो वाढेल. असे मत सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले यांनी व्यक्त केले.
श्री सद्गुरु हरिभाऊ महाराज सरकार प्रशिक्षण सहकारी संस्था मर्यादित फलटण या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. नवनिर्वाचित संचालक मंडळ यांच्यामधून ॲड शितल अहिवळे यांची चेअरमनपदी निवड तर ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांची व्हा. चेअरमन पदी निवड करण्यात आली. चेअरमन - व्हा. चेअरमन यांची निवड करताना दिलीपसिंह भोसले यांनी प्रशिक्षणाची आवशकता प्रखरपणे मांडली.
याप्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन ॲड शितल अहिवळे व व्हा. रवींद्र बेडकिहाळ सर यांनी चालू वर्षामध्ये सहा ते नऊ प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. याप्रसंगी सर्व नरनिर्वाचित संचालक मंडळ, ॲड. नरसिंह निकम, संदीप जगताप हे उपस्थित होते.
No comments