कास पठारावर ई व्हेईकलचे उद्घाटन ; पुष्पहंगामात पर्यटकांची मोठी सवय
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ सप्टेंबर २०२५ - कास पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी ई कार्ट व्हेईकल रविवारी दाखल झाल्या . दहा आसनी वाहनांचे जागतिक पर्यटनं दिनाच्या निमित्ताने उद्घाटन करण्यात आले .
वाहनांचे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते कास पुष्प पठारावर ई वेहिकल सफारी गाडीचे उद्घाटन झाले . यावेळी शिक्षण आयुक्तांच्या पत्नी अर्चना प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा श्रीमती याशनी नागराजन यांनी कास पुष्प पठार येथे इ वेहीकल सफारी गाडीचे उद्घाटन केले व कास पठारा ला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या प्रदूषणमुक्त सफारीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे मान्यवरांनी आवाहन केले.
यावेळी सातारा व मेढा वनपरिक्षेत्राचे अधिकारी श्री संदीप जोपळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा अनिस नायकवडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा धनंजय चोपडे, वनपाल बामनोली श्रीमती उज्वला थोरात ,वनपाल रोहोट श्री राजाराम काशीद, वनरक्षक कास श्री समाधान वाघमोडे ,वनरक्षक श्री दत्तात्रय हेर्लेकर, वनरक्षक श्री आकाश कोळी, वनरक्षक श्री तुषार लगड, वनरक्षक श्री राहुल धुमाळ व संयुक्त वन व्यवस्थापन समिती कास, एकीव आटाळी ,कुसुम्बी ,पाटेघर, कासानी चे अध्यक्ष सचिव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments