फडतरवाडी येथे आठवडा बाजार सुरु ; पहिल्याच दिवशी झाली मंडईत हजारो रुपयांची उलाढाल
Weekly market begins at Phadtarwadi;
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ ऑक्टोबर २०२५ - फडतरवाडी ता. फलटण येथे श्री ज्योतिर्लिंग मंदिराजवळ नव्याने आठवडी बाजार ग्रामपंचायत च्या वतीने सुरु करण्यात आला असून त्याचे उदघाटन सरपंच सौ. पौर्णिमा प्रेमाजित काटे देशमुख उपसरपंच अमोल रामदास फडतरे देशमुख, सोसायटीचे चेअरमन सुभाष अण्णा फडतरे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सर्व सदस्य उपस्थित पत्रकार व जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पहिल्याच हजारो रुपयांची उलाढाल झाली.
बागायती पट्ट्यात फडतरवाडी हे गाव बागायतदारांचे गाव म्हणून ओळखले जाते तसेच ग्रामपंचायत च्या वतीने गावात व वडीवस्तीवरती मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या असून आपल्या गावात आठवडा बाजार सुरु करावा अशी संकल्पना पुढे आली त्या अनुषंगाने आज मंगळवार दि. 30 रोजी दुपारी चार वाजता उपस्थित्यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी ग्रामस्थ तसेच जेष्ठ मार्गदर्शक व तरुण वर्ग व भाजीपाला तसेच तरकारी व्यापारी, शेतकरी या बाजारात उपस्थित होते.

No comments