Breaking News

फलटण येथे दि.२४ रोजी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन

Taluka level Athletics games competition organized in Phaltan on 24th

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० ऑगस्ट २०२५ - फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन, फलटणच्या वतीने मुधोजी महाविद्यालय क्रीडांगण, फलटण येथे रविवार, दि.24 ऑगस्ट 2025 रोजी फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आल्या असून, या मैदानी स्पर्धेत 12,14,16,18 व 20 वर्षे वयोगटातील फलटण तालुक्यातील मुला मुलींना सहभागी होता येईल. जास्तीत जास्त स्पर्धकांनी फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनकडून करण्यात आले आहे.

    फलटण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचा शुभारंभ  रविवार दि.24  ऑगस्ट  2025 रोजी सकाळी 9.30  वाजता मान्यवरांच्या हस्ते मुधोजी महाविद्यालय,  फलटणच्या क्रीडांगणावर होणार आहे. 20 वर्ष आतील मुले-मुली यांना 100 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे, लांब उडी व गोळा फेक या क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल. वयोगट 18 वर्ष आतील मुले-मुली यांना 100 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 1000 मीटर धावणे , लांब उडी व गोळा फेक या क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल. वयोगट 16 वर्ष आतील मुले-मुली यांना 100 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, ,800  मीटर धावणे, लांब उडी व गोळा फेक या क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल.

    वयोगट 14 वर्ष आतील मुले-मुली यांना 100 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 600 मीटर धावणे, लांब उडी  व गोळा फेक या क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल. वयोगट 12 वर्ष आतील मुले -मुली यांना 100 मीटर धावणे, 300 मीटर धावणे, लांब उडी व गोळा फेक  या क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल.

    स्पर्धकांनी नाव नोंदणीसह प्रवेश फी 30 रुपये जमा करून आपले चेस नंबर दि.20 ऑगस्ट 2025 ते 22 ऑगस्ट 2025 या कालावधीत स.10.00 ते दु 1.00   वा.या वेळेत जिमखाना विभाग, मुधोजी महाविद्यालय, फलटण येथून घेऊन जावेत. प्रत्येक खेळाडूस २ क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवता येईल. प्रत्येक क्रीडा प्रकारात प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक काढून त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.

    स्पर्धेसंबंधी अधिक  माहितीसाठी संपर्क  -
जनार्दन पवार-मोबा. ९२८४७६५९९५, नामदेव मोरे मोबा. ९९६००८२१२०, ॲड. रोहित अहिवळे मोबा. ७४९९५३७९३७, राज जाधव-मोबा. ९२२६१३९६५३, तायाप्पा शेंडगे -मोबा. ९३२२७४८१९९, धीरज कचरे मोबा. ८३९०९९१९९९, सुहास कदम- मोबा. ७०८३७२०५२०, सूरज ढेंबरे- मोबा. ८८०५७७७९९८ यांच्याशी संपर्क साधावा.

No comments