Breaking News

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार

Sexual assault by threatening to make the video viral on social media

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ ऑगस्ट२०२५ - शरीरसंबांधाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी फलटण येथील २४ वर्षीय तरुणावर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये बाल लैंगिक अत्याचार कायदा आयपीसी अतंर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    गौरव आदेश निंबाळकर रा. फलटण जि. सातारा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०१९ ते मे २०२५ दरम्यान फलटण जि.सातारा येथील आरोपीच्या घरा जवळच असलेल्या जुन्या पडक्या खोलीत, फलटण येथील लॉज तसेच करंजेपुल ता. बारामती जि. पुणे येथे आरोपी याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. पीडिता ही नोव्हेंबर २०१९ मध्ये मुधोजी हायस्कुल फलटण ता. फलटण जि.सातारा येथे इयत्ता १० वीत शिक्षण घेत असताना,  गौरव आदेश निंबाळकर यांची ओळख झाली. त्यानंतर तो पीडितेशी बोलत होता, सन 2020 मध्ये आरोपी याने पीडितेला वाईट भावनेने शरीरसुखाची मागणी केली असता, तिने त्यास नकार दिला. त्यावेळी आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ केली आणि त्रास देवु लागला, मी तुझ्या घरच्यांना तुझ्यासोबत काहीपण सांगेन, तुझी बदनामी करेन, अशी धमकी देवु लागल्याने व पीडितेने आरोपीशी फोनवर बोलण्याचे बंद केल्याने, आरोपीने एके दिवशी पीडिता ही घरी एकटी असताना, आरोपीने राहते घरात येवुन पीडितेस 'तु माझेशी फोनवर बोल नाही तर मी तुझ्याबाबत तुझे घरच्यांना तुझे व माझे लफडे आहे असे सांगतो' अशी धमकी दिली.

    त्यानतर काही दिवसांनी आरोपीने फिर्यादीस फोन करून बोलावुन घेवुन, तिच्या उजवे हाताला धरून त्याचे ताब्यातील काळ्या मोटार सायकलवर बसवुन फलटण येथील लॉज येथे नेत, पिडीतेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीसंबध केले. त्यावेळी त्याने त्याच्या मोबाईलमध्ये फिर्यादीचे उघडे फोटो तसेच फिर्यादी व आरोपी या दोघांचे उघडे फोटो, व्हिडीओ काढुन, फिर्यादीस तु जर सदर प्रकार घरी सांगीतला तर, मी तुझे उघडे फोटो, व्हिडीओ सगळीकडे व्हायरल करील अशी धमकी देऊन, पीडितेस ब्लॅकमेल करून जबरदस्तीने लॉजवर नेवुन फेब्रुवारी 2024 पर्यंत वेळोवेळी पीडितेशी तीच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबध केले आहेत. त्यानंतर दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास आरोपीने पीडिता राहत असलेले करंजेपुल येथे येवुन, तु माझे सोबत लॉजवर चल नाहीतर मी माझे मोबाईलमध्ये असलेले तुझे उघडे फोटो, व्हिडीओ हे सोशल मिडीयावर व्हायरल करेन अशी धमकी देवुन फिर्यादीस हाताने मारहाण करून, तुला सुखाने जगु देणार नाही. असे म्हणुन जिवे मारणेची धमकी दिली आहे.

No comments