कु.प्रतीक्षा गौतम काकडे यांची सहाय्यक कृषी अधिकारीपदी निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : दि. १३ ऑगस्ट २०२५ - सन २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे घेण्यात आलेल्या कृषी विभागाच्या परीक्षेत मंगळवार पेठ, फलटण येथील कु. प्रतीक्षा गौतम काकडे यांनी यश मिळवत कडेगाव, जि. सांगली येथे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कु. प्रतीक्षा यांचे शिक्षण श्रीमंत मालोजीराजे शेती महाविद्यालय, फलटण येथे झाले असून, त्यांनी चिकाटी, मेहनत आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर ही यशस्वी कामगिरी साधली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून हार, बुके, शाल देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच दूरध्वनीद्वारेही अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
No comments