विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची यशस्वी सुटका
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ ऑगस्ट २०२५ - बरड गावात एक कोल्हा विहिरीत पडून अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही माहिती समजताच सतर्क स्थानिक नागरिक आणि सर्पमित्रांनी तात्काळ नेचर अँड वाइल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांच्याशी संपर्क साधला.
संस्थेचे पथक व वन विभाग, फलटण यांच्या संयुक्त प्रयत्नांतून घटनास्थळी तातडीने पोहोचून अडकलेल्या कोल्ह्याची सुरक्षित सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याला तपासणी करून जवळच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.
स्थानिकांनी या तात्काळ आणि समन्वयित बचावकार्यासाठी सर्वांचे कौतुक केले आहे.
No comments