ही दौलत लोकशाहीराची" कार्यक्रमाने अण्णाभाऊंची जयंती संस्मरणीय
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ ऑगस्ट २०२५ - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ऑगस्ट महिन्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया, फलटण तालुक्याच्या वतीने सोमवार पेठ येथे सुप्रसिद्ध अमोलराज प्रस्तुत "ही दौलत लोकशाहीराची" या भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम नुकताच पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी अरिहंत टीव्हीएस फलटणतर्फे सिद्धांत दोशी यांनी शालेय विद्यार्थ्यांना 15 डझन वह्यांचे वाटप केले. त्यानंतर अमोलराजचे गायक राजेश माने, सागर भोसले आणि फॅन झालो ग फेम गायक ऋतिक गंगावणे यांनी सादर केलेल्या भीमगीतांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाला ॲड. संदीप कांबळे, माजी नगरसेवक विक्रम जाधव, पत्रकार सचिन मोरे, पत्रकार संदीप कुमार जाधव, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सातारा जिल्हाध्यक्ष सनीभाई ननावरे, सतीश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा युथ अध्यक्ष मंगेश आवळे, तालुकाध्यक्ष निलेश घोलप, युथ तालुकाध्यक्ष गणेश यादव, आदित्य पाटोळे व रोहित आडागळे यांनी संयुक्तपणे केले.
No comments