Breaking News

गॅलेक्सी नव्या उंचीवर ; गॅलेक्सीला मल्टिस्टेट मल्टिपर्पज सहकारी संस्था म्हणून अधिकृत मान्यता

Galaxy reaches new heights; Galaxy officially recognized as a multistate multipurpose cooperative society

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ ऑगस्ट २०२५ - घराघरात विश्वासाची परंपरा निर्माण करणाऱ्या के. बी. उद्योग समूहाचा प्रकल्प असलेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आपल्या यशस्वी प्रवासात आणखी एक टप्पा गाठला आहे. नुकताच केंद्र शासनाच्या सहकार विभागाकडून गॅलेक्सीला मल्टिस्टेट मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. म्हणून अधिकृत मान्यता मिळाली असून, आता गॅलेक्सीने आपले कार्यक्षेत्र महाराष्ट्र पुरतेच मर्यादित न ठेवता, इतर राज्यांमध्ये विस्तार करून, आपल्या सदस्यांना अधिक व्यापक आर्थिक सेवा देण्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. यामुळे संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्राच्या पलीकडे इतर राज्यांपर्यंत विस्तारले जाणार आहे.

    के. बी. एक्सपोर्टच्या माध्यमातून गॅलेक्सी अनेक शेतकऱ्यांशी जोडली गेलेली असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी गॅलेक्सी नेहमीच कार्यरत आहे. सध्या गॅलेक्सीची सभासद संख्या १०,००० पेक्षा अधिक असून, ४९ कोटी रुपयांच्या ठेवी व ३९ कोटी रुपयांच्या कर्जाचे यशस्वी वितरण झाले असून ८८ कोटींचा एकत्रित व्यवसाय आहे. फलटण, राजाळे, साखरवाडी आणि पिंपरी चिंचवड येथे शाखा कार्यरत असून, लवकरच बारामती येथे नव्या शाखेचे भव्य उद्घाटन होणार आहे. संस्थेने ८० हून अधिक कर्मचाऱ्यांना स्थिर रोजगाराची संधी दिली आहे.

    उत्कृष्ट कामगिरीच्या बाबतीत गॅलेक्सी नेहमीच आघाडीवर राहिली आहे. सलग चार वर्षे बँको ब्ल्यू रिबिन पुरस्कार पटकावत उत्कृष्ट सेवा सिद्ध केली असून, सातत्याने 'ऑडिट वर्ग अ' चा दर्जा टिकवला आहे. प्रत्येक शाखेत अत्याधुनिक गोल्ड टेस्टिंग मशीनची सुविधा उपलब्ध आहे. संस्थेचा एन.पी.ए. १% पेक्षा कमी ठेवत आर्थिक स्थैर्य व विश्वास दृढ केला आहे. विशेष म्हणजे, एकूण कर्जापैकी ५०% पेक्षा अधिक कर्ज हे सुरक्षित सोने तारण कर्ज स्वरूपात दिले गेले आहे, ज्यामुळे सभासदांना त्वरित आणि विश्वासार्ह आर्थिक मदत मिळत आहे.

    संस्थेचे संस्थापक व चेअरमन सचिन यादव यांनी यशाबद्धल समाधान व्यक्त करत सांगितले की, "गॅलेक्सीचा उद्देश केवळ आर्थिक सेवा देणे नाही, तर प्रत्येक सभासदाचा सर्वांगीण विकास आणि आर्थिक स्वावलंबन घडवणे हा आहे. मल्टिस्टेट मल्टिपर्पज परवाना मिळाल्यामुळे आम्हाला विविध राज्यांमध्ये ठेवी, कर्ज, गुंतवणूक योजना आणि इतर सेवा पुरवून सहकारी क्षेत्रात नवीन मानदंड निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. तसेच, मल्टिपर्पज स्वरूपामुळे नव्या उद्योगांची निर्मिती व मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती हे आमचे उद्दिष्ट आता अधिक प्रभावीपणे साध्य होईल."

    या नव्या विस्तारित रूपामुळे गॅलेक्सी येत्या काळात महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाखा सुरू करणार असून, प्रत्येक घराशी विश्वासाचे नाते अधिक घट्ट करण्याचा संकल्प आहे.

No comments