साताऱ्याचा सुप्रसिध्द मावा केक फलटणमध्ये ; देवत्व बेकर्सचा स्वातंत्र्यदिनी शुभारंभ
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ ऑगस्ट २०२५ - सातारा शहरासह परजिल्ह्यात जीभेवर रेंगाळणारी मावा केकची चव आता आपल्या फलटणवासीयांचे मन जिंकणार आहे. साताऱ्यातील सुप्रसिध्द देवत्व बेकर्सच्या स्पेशल मावा केक व इतर उत्पादनांची विक्री फलटण येथील भक्ती एंटरप्रायजेसमध्ये सुरु होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी हा 'स्वादोत्सव' साजरा होणार असून, स्वातंत्र्य दिनाचा गोडवा मावा केक खाऊनच साजरा करायचा आहे.
मावा केक खायचा म्हंटलं तर पहिले आणि विश्वसनीय नाव पुढे येते, ते साताऱ्यातील देवत्व बेकर्सचे. देवत्व बेकर्सचा स्पेशल मावा केकने लाखो खवैय्यांना भुरळ घातली आहे. वाढदिवस असो... लग्नाचा वाढदिवस असो... कोणताही आनंदाचा उत्सव, क्षण असो... अतिथी देवा भव असो... त्यावेळी सातारकर पहिली पसंती देवत्व बेकर्सच्या मावा केकला देत असतात.
देवत्व बेकर्सचा शुध्द शाकाहारी मावा केक ड्रायफ्रूटने समृध्द आहे. संपूर्ण साताऱ्यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक आदी तसेच बंगळूरु, अहमदाबाद, सुरत, दिल्ली येथील अनेक खवैय्यांना या मावा केकची भुरळ आहे. याशिवाय, दुबई, कॅनडा, जर्मनी या देशातील भारतीयांनीही मावा केकचा स्वाद घेत आनंद व्यक्त केला आहे.
सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उच्चभ्रू लोक, सेलिब्रिटी, शासकीय अधिकारी यांच्यासह नामांकित व्यावसायिक, उद्योजकांनीही मावा केकच्या चवीचा आनंद लुटला आहे. एकदा केक खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा हाच मावा केक खाल्ला जातो, यावरुनच याच्या चवीचा अंदाज येतो.
मावा केक खाताच 'लई भारी, अप्रतिम, लाजवाब, ऑसम, नादखुळा, मस्तच, दिल मांगेे मोअर...' अशा अनेक उत्स्फुर्त प्रतिक्रिया खवैय्यांकडून मिळत असतात. आता रामनगरी फलटणवासीयही खूश होणार, याची हमखास खात्री आहे, असे देवत्व बेकर्सच्या मालक अस्मिता पाटील व भक्ती एंटरप्रायजेसचे प्रोप्रा. पत्रकार यशवंत खलाटे- पाटील यांनी सांगितले.
स्वातंत्र्य दिनी देवत्व बेकर्सच्या मावा केक, व्हॅनिला बटर केक, चॉकलेट केकच्या विक्रीचा प्रारंभ भक्ती एंटरप्रायजेसमध्ये होणार आहे. राममंदिराशेजारील कसबा पेठमधील बुरुड गल्ली येथील अश्विनी लेडीज शॉपी, पेंढारकर इलेक्ट्रानिक्स शेजारी हे शॉप आपल्या सेवेत रुजू होत आहे. 'स्वादोत्सव'च्या शुभारंभास सर्वांनी यावे, असे आवाहन पत्रकार यशवंत खलाटे- पाटील यांनी केले आहे. संपर्क - 9421213656/9822973344
No comments