डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन दुरुस्ती व सुविधा सुधारणा करण्याची मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ ऑगस्ट २०२५ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन (समाज मंदिर), मंगळवार पेठ, फलटण या ऐतिहासिक व सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाच्या वास्तूची दुरुस्ती तसेच देखभाल तातडीने करण्यात यावी, अशी मागणी लुंबिनी बहुद्देशीय संस्थेच्यावतीने लेखी स्वरूपात करण्यात आली आहे.
या निवेदनामध्ये समाज मंदिरात पूर्वीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्तमानपत्र वाचनाची सुविधा पुन्हा सुरू करणे, तसेच आंबेडकर वाचनालयातील खिडक्यांना साउंड प्रूफ ग्लास व बाहेरील बाजूस मजबूत ग्रील बसविणे यांचा समावेश होता.
हे निवेदन लुंबिनी बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक कुणाल किशोर काकडे व ॲड. सुरज काकडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मा. मुख्याधिकारी मोरे साहेब यांना सादर केले. या निवेदनाची गंभीर दखल घेत मुख्याधिकारी मोरे साहेबांनी सर्व कामे पूर्ण करण्याची ग्वाही संस्थेच्या प्रतिनिधींना दिली.
स्थानिक नागरिकांतून या उपक्रमाचे स्वागत होत असून, या निर्णयामुळे स्मृती भवनाचा उपयोग अधिक परिणामकारक व समाजहितार्थ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
No comments