Breaking News

स्वातंत्र्यदिनी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी सराव पेपर स्पर्धेचे आयोजन

Organizing a practice paper competition for competitive exam preparation on Independence Day

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ ऑगस्ट २०२५ -  देशाचा 79 वा भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त फलटण तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय विभाग व विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी सराव पेपर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

    दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी सराव पेपर मुधोजी हायस्कूल फलटण येथे होणार असून त्यासाठी पूर्व नाव नोंदणी करणे गरजेचे आहे सदरची नाव नोंदणी डॉ. बी आर आंबेडकर आयआयटी इन्स्टिट्यूट फलटण आयसीसीआय बँकेसमोर लक्ष्मी नगर येथे 14 ऑगस्ट पर्यंत करणे गरजेचे आहे. यासाठी प्रवेश फी 50 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्या पुरुष आणि महिला गटातील वेगवेगळ्या स्पर्धकास 10 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 7 हजार रुपये तृतीय क्रमांक 5 हजार रुपये, चौथ्या क्रमांकास 3 हजार रुपये, पाचव्या क्रमांकास 2 हजार रुपये, सहाव्या क्रमांकास 1 हजार रुपये अशी स्वतंत्र बक्षीस देण्यात येणार आहे.

    अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी  9284274913,8010239062,9665509835,9657130014,8796211924 या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments