Breaking News

फलटणमध्ये ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत मानवी साखळी

Human chain formed in Phaltan under the 'Drug-Free India' campaign

    फलटण फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ ऑगस्ट २०२५ - दि. १३ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सातारा जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत’ अभियान राबविण्याबाबत  पोलीस अधीक्षक, सातारा यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी दत्तनगर येथे स्वरूपा अकॅडमी आणि फलटण शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी मानवी साखळी आयोजित करण्यात आली.
    या मानवी साखळी दरम्यान नशेमुळे होणारे दुष्परिणाम दाखवणारे फलक प्रदर्शित करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमात स्वरूपा अकॅडमीचे संस्थापक श्री. सुरज दत्तात्रय भिसे, अकॅडमीचे ३५ ते ४० विद्यार्थी तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे, पोलीस अंमलदार महेश जगदाळे, मुकेश घोरपडे, स्वप्नील खराडे व पांडुरंग धायगुडे यांनी सहभाग घेतला.
    या उपक्रमासाठी पोलीस अंमलदार विक्रम कुंभार यांनी विशेष मेहनत घेतली. नागरिकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करून नशामुक्त समाजासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments