मुधोजी महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ ऑगस्ट २०२५ - फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साह पूर्ण वातावरणात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सकाळी ०८:०५ वाजता फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी फ. ए. सोसायटी फलटणचे गव्हर्नमेंट कौशल सदस्य मा.डॉ. संजय राऊत,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ .पी.एच. कदम,उपप्राचार्या प्रा.सौ.उर्मिला भोसले,गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो.डॉ.टी.पी. शिंदे, विविध समित्यांचे प्रमुख,प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भितीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले,यावेळी भितीपत्रकाचे प्रमुख प्रा.एस. पी.निंबाळकर,सदस्य प्रा.एन. बी.करे, प्रा. आर. बी.गवळी, प्रा. ए. एम.शिंदे, प्रा.सौ. पी. ए.कदम, प्रा.सौ. जी. आर.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ' जागर महाराष्ट्राच्या लोककलेचा' या विषयावर १७ विद्यार्थ्यांनी ३७ रेखाचित्रे रेखाटली होती,याचे उद्घाटन मा. श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच राष्ट्रीय सेवा योजना व फलटण मेडिकल फौन्डेशन ब्लड बँक,यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित केले होते त्यामध्ये ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले,याचे संयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा.फिरोज शेख, डॉ.वैशाली कांबळे, प्रा.प्रशांत शेट्ये व सर्व सदस्य यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा.संतोष धुमाळ एन. सी.सी.विभाग, प्रा.सौ. लीना शिंदे, प्रा.काळेल मॅडम व डॉ.स्वप्नील पाटील यांनी केले,यावेळी राष्ट्रीय सुरक्षा विभागात सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष धुमाळ व प्रा.सौ.लीना शिंदे यांनी केले,शेवटी प्रा.काळेल मॅडम यांनी आभार मानले.

No comments