Breaking News

जिद्द आणि अथक परिश्रमातून गाठले उत्तुंग यश ; डॉ.प्रज्ञा आगवणे यांना एम.डी. पॅथॉलॉजीसाठी प्रवेश

Dr. Pragya Agawane Secures Admission for M.D. in Pathology

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३० : येथील प्रख्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रविण आगवणे व त्वचारोग व कॉस्मेटिक तज्ज्ञ डॉ. सौ. दिपा आगवणे यांनी गेल्या २८ वर्षांपासून तुलसी अ‍ॅक्सिडेंट अँड जनरल हॉस्पिटलच्या माध्यमातून फलटण व परिसरात उल्लेखनीय रुग्णसेवा बजावली आहे. या सेवाभावी परंपरेचा वारसा आता त्यांच्या पुढील पिढीकडून समर्थपणे पुढे नेला जात असल्याचे दिसून येत आहे.

    त्यांची कन्या डॉ. प्रज्ञा आगवणे हिला पदव्युत्तर शिक्षणासाठी एम.डी. पॅथॉलॉजी या शाखेत नवी मुंबई येथील अग्रगण्य महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेजमध्ये गुणवत्तेवर प्रवेश मिळाला आहे. ही बाब आगवणे कुटुंबीयांसाठी अभिमानाची ठरली आहे. डॉ. प्रज्ञा यांनी एम.बी.बी.एस. शिक्षण महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमधून डिस्टिंक्शनसह पूर्ण केले असून, भविष्यात संशोधन क्षेत्रात कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे.

    दरम्यान, आगवणे दांपत्यांचा सुपुत्र हर्षवर्धन प्रविण आगवणे सध्या एम.बी.बी.एस.च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असून, तोही वैद्यकीय क्षेत्रात प्रगतीपथावर आहे.

    डॉ. प्रज्ञा यांच्या या यशाबद्दल मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील,  नगराध्यक्ष समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर, सौ. मनीषा नाईक निंबाळकर तसेच युवा नेते व स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजितभैय्या नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments