फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते यांचा पदग्रहण समारंभ
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१ - फलटण पंचायत समितीचे उपसभापती म्हणून अमोल दशरथ सस्ते यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता पंचायत समिती, फलटण येथे करण्यात आले असून, या कार्यक्रमाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या विविध पातळीवरील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र विधान परिषद मा.सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरदराव कणसे, कराड नगरीचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी आमदार दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, सातारा जिल्हा समन्वयक विराज खराडे, उपजिल्हाप्रमुख अविनाश फडतरे, तालुका संघटक विजयराव मायने, तालुकाप्रमुख पिंटूनाना इवरे, ज्ञानेश्वर पवार, हेमंत सुतार, शहर प्रमुख निलेश तेलखडे, युवा सेना जिल्हा प्रमुख सचिन चव्हाण, जिल्हा समन्वयक अमित पवार, जिल्हा उपाध्यक्ष आकाश रिटे तसेच तालुकाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने फलटण तालुक्यातील विकासकामे, संघटनात्मक बळकटी आणि आगामी राजकीय वाटचालीवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरु असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमोल सस्ते यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, हा कार्यक्रम फलटणच्या राजकीय दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

No comments