आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस दि. २ एप्रिल रोजी असला तरी, राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक राहुल निंबाळकर यांनी सांगितले की, कै. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली असून, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमदार सचिन पाटील यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आमदार सचिन पाटील हे सध्या कौटुंबिक कारणास्तव बाहेरगावी असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

No comments