फलटण शहरात डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ ऑगस्ट २०२५ - मौजे फलटण गावच्या हद्दीत रेस्ट हाऊस, लक्ष्मीनगर येथे दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8 वाजता लग्नातील वरातीत ट्रॅक्टरवर डीजे साऊंड वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी विशाल शेंडगे या युवकाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम एकनाथ कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल शेंडगे याने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर-ट्रॉलीवर "जयशंकर डीजे साऊंड सिस्टिम" नावाची साऊंड सिस्टीम कर्कश्य आवाजात वाजवत सार्वजनिक उपद्रव केला. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला व परिसरातील शांतता भंग झाली.
या प्रकरणी भा. दं. सं. कलम 223, 292, 285 तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम 38/136 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस हवालदार माधवी बोडके करत आहेत.

No comments