स्वातंत्र्यदिनी निखिल निंबाळकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ ऑगस्ट २०२५ - फलटण तहसिल कार्यालय येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर प्रहार शेतकरी व दिव्यांग संघटनेच्या आंदोलकांशी फलटण कोरेगावचे आमदार चर्चा करत होते. यावेळी राजाळे येथील निखिल निंबाळकर या युवकाने अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. प्रहार संघटनेतील एका जागरूक शेतकऱ्यानी निखिल यास थांबवत हातातील बाटली हिसकावून घेतली. निखिल याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले होते, यावेळी शेतकऱ्यांनी त्यास रोखले व पोलिसांच्या ताब्यात दिले.
निखिल निंबाळकर या युवकाने अनेक महिन्यापासून राजाळे येथील जानाई मंदिर ते सरडे अतिक्रमित रस्त्याच्या प्रश्नासाठी तहसिल कार्यालय फलटण तसेच जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे निवेदने दिली असून यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही व न्याय मिळत नसल्याने आपण आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे निखिल निंबाळकर या युवकाने सांगितले.

No comments